पुणे दिनांक २५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील बोपोडी भागात भीषण अपघाताची माहिती आली आहे.एसटी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बसने एक कार व दुचाकीला जोरात धडक दिल्याने एकजण ठार झाला आहे.तर अन्य सहा जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरची घटना ही सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या अपघातात एसटी बस व कारचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.यात एस टी बसची काॅबिन पुर्णपणे निखाळून काॅबिनचा पत्रा तुटून पडला आहे तर तर कारचे दोन्ही दरवाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.