पुणे दिनांक २५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्रपती संभाजीनगर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याला विरोध करणारे शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व महाविकास आघाडीचे नेते मंडळी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांनी काळे कपडे घालून हातात फलक घेऊन मानवी साखळी बनवण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन आता शांत झाले आहे.दरम्यान संभाजीनगर विमानतळाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त असून थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या विमानतळावर आगमन होईल.