Home Breaking News कोल्हापूरातील घाडगे नंतर पुणे जिल्ह्यातील नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार?

कोल्हापूरातील घाडगे नंतर पुणे जिल्ह्यातील नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार?

66
0

पुणे दिनांक २५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुक जवळ आल्यानंतर अनेक नेते आपल्याला तिकीट मिळवण्यासाठी साठी प्रयत्न करत आहे.यात काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समावेश आहे.महायुती सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यामुळे अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आता त्यांच्या विधानसभा मतदारसंघ मध्ये मोठ्या प्रमाणावर अडचण झाली आहे.त्यांचे कारण देखील तसे आहे.नुकत्याच कोल्हापूर येथील कागल मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे नेते  समरजित घाडगे यांनी.भाजपला सोडचिठ्ठी देत जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.आता पुणे जिल्ह्यातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील देखील हे शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान कागल येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व मंत्री हसन मुश्रीफ आहेत.आता अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यामुळे कागल मध्ये महायुतीकडून मुश्रीफ यांनाच पुन्हा संधी दिली जाईल तर भाजप पक्षाचे नेते समरजित घाडगे यांना भाजप मधून कागल मतदार संघात निवडणूक लढवायची होती पण युती धर्म त्यामुळे त्यांना या मतदारसंघात भाजप कडून तिकीट मिळणार नव्हते म्हणून त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर मुश्रीफ हे पूर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते.पण त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडी मध्ये शरद पवार गटाला मिळणार आहे.तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती आहे.इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तामामा भरणे आमदार आहेत.ते देखील अजित पवार गटा सोबत गेले आहे.तर येथून भाजप पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत.पण येथे देखील महायुती धर्म असल्यामुळे येथे देखील पून्हा अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे यांनाच उमेदवारी मिळणार  त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना देखील या मतदारसंघात भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार नाही.त्यामुळे ते देखील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहे.इंदापूर मतदार संघ हा महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे आहे.तसेच दत्तामामा  यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे काम केले होते.त्यावेळी निवडणूकीत दत्तामामा यांच्या बरोबर शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांच्यात हामरा तुमरी झाली होती.याचा वचपा आता काढण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघात चांगलीच फिल्डींग लावली आहे.त्यामुळे आता कोल्हापूरातील कागल नंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जेष्ठ नेते शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्या रुपाने भाजपला तगडा झटका देणार का ? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश बाबत चर्चा सुरू आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर सूचक वक्तव्य केले आहे.तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ‘ त्यांना जायचे असेल तर कोण अडवू शकणार नाही? ” असे वक्तव्य केले आहे.त्यामुळे आता इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील हे काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

Previous articleपुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट, खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू पुलाची वाडी घरात पाणीच पाणी
Next articleशिवसेनेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here