Home Breaking News रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींवर लैंगिक अत्याचार , बेशुद्धावस्थेत आढळली

रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींवर लैंगिक अत्याचार , बेशुद्धावस्थेत आढळली

69
0

पुणे दिनांक २६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणीवर भरदिवसा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारी रुग्णालयातील नर्सेसनी या घटनेनंतर निषेध करत आरोपींला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.सदरच्या तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ती बेशुद्धावस्थेत आढळली आहे.तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नर्सिंग शिक्षण घेणारी वीस वर्षाची तरुणी ही सकाळी सहा वाजता घरातून निघाली होती.ती काॅलेजला जात असताना भरदिवसा झालेल्या अत्याचारानंतर रत्नागिरीत एकच खळबळ उडाली व संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयातील परिचारिका व कामगार यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान रत्नागिरी सारख्या ठिकाणी अशी घटना घडली आहे.आम्हाला सुरक्षित वाटत होतं‌ पण अशा घटनेनंतर आता भीती निर्माण झाली आहे.चुकीच्या घटना घडत आहेत.आरोपीला  तातडीने पकडून फाशीची शिक्षा द्यावी.अशी मागणी शासकीय रुग्णालयातील परिचारिका व कामगार यांनी केली आहे.घटनेनंतर आता शासकीय रुग्णालयातील परिचारिका यांनी सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.

Previous articleसंभाजीनगर मध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने पोलिसांकडून लाठीचार्ज
Next articleपंढरपुरात भीमा नदीला पूर,३५ कुटुंबाचे स्थलांतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here