पुणे दिनांक २८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज बुधवारी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मनी लाॅंड्रिंग प्रकरणातील गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान भोसले यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) ने नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचे पुराव्यांतून दिसून येत नाही.असे निरीक्षण न्यायालयाने त्यांना दिलासा देताना प्रामुख्याने नोंदवले दरम्यान ईडीने दिनांक २८ जून २०२२ रोजी भोसले यांना अटक करण्यात आली होती.तब्बल दोन वर्षांनी अविनाश भोसले यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ते दोषी नाहीत हे मानण्याची अनेक कारणे आहेत.याशिवाय अदखल पात्र गुन्ह्यांमध्ये भोसले यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.असेदेखील न्यायमूर्ती मनीष पिताळे यांनी भोसले यांची जामिनाची मागणी मान्य करताना प्रामुख्याने स्पष्ट केले.भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय) ने २६ मे २०२२ रोजी अटक केली होती.त्यानंतर याच गुन्ह्यांच्या आधारे ईडीने भोसले यांना अटक केली होती.सीबीआयने नोंदवलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयानेच त्यांना जामीन मंजूर केला होता.