Home Breaking News मालवण पुताळा दुर्घटना नंतर १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आंदोलन

मालवण पुताळा दुर्घटना नंतर १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आंदोलन

55
0

पुणे दिनांक २८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारनं भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. शिवरायांचा पुतळा कोसाळण्यासारखी घटना यापूर्वी कधीच घडली नाही. स्मारकाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे.आता पुतळा उभारण्याचे टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारवर केला आहे. केसरकर जे बोलतोय ते भंयाकर आहे.जे मालवणला शाहांचे दलाल रस्ता अडवून बसले आहेत.तसेच जोरदार वा-यानी कोश्यारींची टोपी उडाली नाही.या सरकार बाबत नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर चीड आहे.असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.१ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.असे आजच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान पुढं बोलताना ठाकरे म्हणाले की.नौदलावर जबाबदारी टाकून मोकळे होता येणार नाही.गुन्हे दडपून टाकण्यात येत आहे.महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे.कायदा सक्षम पण  दबावतंत्र सुरू आहे.येत्या रविवारी १ सप्टेंबर  रोजी रविवारी हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. तिन्ही पक्षातील शिवप्रेमी मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक एक तारखेनंतर संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात सरकार विरोधात आंदोलन सुरू करणार काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

.

Previous articleराजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणेंचं – प्रतिआव्हान‌, पोलिसांची मोठ्या प्रमाणावर फोर्स दाखल
Next articleहिंगोलीत अजित पवार यांच्या सभेत मराठा समाजाच्या आंदोलंकाचा राडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here