Home Breaking News राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणेंचं – प्रतिआव्हान‌, पोलिसांची मोठ्या प्रमाणावर फोर्स दाखल

राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणेंचं – प्रतिआव्हान‌, पोलिसांची मोठ्या प्रमाणावर फोर्स दाखल

56
0

पुणे दिनांक २८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उध्दव ठाकरे व नारायण राणे समर्थकांचा मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.येथे आता दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांच्या गटाला आव्हान तसेच प्रतिआव्हान देण्यात आले आहे.किल्यावर  दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे. व एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली आहे. यात विशेष महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे . एकमेकांवर दगड बाटल्या फेकण्यात आल्या तसेच दगडफेक करण्यात आली आहे.दरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्त्यांना एकाच वेळी येथे येणाची परवानगी पोलिसांनी दिलीच कशी ? आता येथे परिस्थिती खूपच चिघळली आहे.व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान आज महाविकास आघाडीच्या वतीने या किल्ल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.हे आधीच जाहीर केले होते.पण केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आज याठिकाणी आमनेसामने आले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी तातडीने किल्यावर पोहोचले आहेत.यावेळी आंदोलनकर्त्यांनी किल्ल्याच्या काठा वरुन दगडफेक केली आहे.यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.दोन्ही गटा बरोबर पोलिसांकडून चर्चा सुरू आहे.दरम्यान मागील एक तासांपासून किल्ल्यावर राडा सुरू झाला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.  आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व  वैभव नाईक.तसेच नारायण राणे.निलेश राणे . नितेश राणे हे उपस्थित आहेत.माजी खासदार विनायक राऊत हे देखील आले आहे. यांच्यामुळे किल्ल्याचे नुकसान झाले आहे.

Previous articleमहाविकास आघाडीची तातडीने मातोश्रीवर बैठक, जेष्ठ नेते शरद पवार व नाना पटोले उपस्थित राहणार
Next articleमालवण पुताळा दुर्घटना नंतर १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here