पुणे दिनांक २९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कोथरूड येथील दहीहंडी उत्सव मध्ये मंगळवारी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या कडून भारतीय जनता पार्टीचे तंत्र शिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांचे गुंड गजानन मारणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.त्यांचा हा मतदारसंघ आहे.तसेच गुंड गजानन मारणे हे याच भागात राहणारे असून त्यांचा या भागात चांगलाच दरारा आहे.दरम्यान यापूर्वी सध्या महायुती सरकार मध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील गुंड गजानन मारणे यांची भेट घेतली होती.त्यावेळी वाद निर्माण झाला होता.