Home Breaking News पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच ATS ची मोठी कारवाई एकच खळबळ, कोंढव्यातून एकाच्या आवळल्या मुसक्या

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच ATS ची मोठी कारवाई एकच खळबळ, कोंढव्यातून एकाच्या आवळल्या मुसक्या

56
0

पुणे दिनांक २९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गणेशात्सापूर्वीच दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने मोठी कारवाई केली आहे.दरम्यान पुण्यातील कोंढवा भागात छापेमारी करून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ३ हजार ७८८ सिम कार्ड जप्त केले आहे.व एक लॅपटॉप तसेच इतर साहित्य देखील ताब्यात घेतले आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपी यांचे नाव नौशाद अहमद सिद्दी असे आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा भागात मोठी कारवाई केली आहे.पुण्यातील कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवादी विरोधी पथकाने छापा टाकला आहे.सदरच्या छाप्यात ३ हजार ७८८ सिम कार्ड सात सिम बाॉक्स वाय फाय आणि सिमबाॅक्स चालविण्यासाठी वापरण्यात येणारे अॅटिना.लॅपटाॅपसह मोठा मुद्देमाल दहशतवादी विरोधी पथकाने जप्त केला आहे.दरम्यान विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल काॅल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंज सुरू होते.दहशतवादी विरोधी पथकाने या कारवाईत नौशाद अहमद सिद्दी या २२ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एम.ए. काॅम्पलेक्स यात हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होते.याला कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती.दरम्यान या बनावट टेलिफोन एक्सचेंज ची  गुप्त माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती.दरम्यान दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान आता या प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाकडून या बाबत तपास सुरू आहे.व नौशाद याच्याकडे देखील चौकशी सुरू आहे.

Previous articleपुण्यात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड,दारु ढोसून गुंडाकडून मध्यरात्री राडा
Next articleछत्रपती शिवरायांचा पुतळा कोसाळल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चेतन पाटीलच्या आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here