Home Breaking News पुण्यात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड,दारु ढोसून गुंडाकडून मध्यरात्री राडा

पुण्यात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड,दारु ढोसून गुंडाकडून मध्यरात्री राडा

61
0

पुणे दिनांक २९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे.बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केली आहे ‌.या तोडफोडीला पुणेकर नागरिक हे वैतागले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.तसेच अनेक भागातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद असल्याने हे टोळकं याचा फायदा घेत आहेत.दरम्यान पुण्यातील अरण्येश्र्वर भागात काही रिकामटेकड्या गुंडांनी दारु ढोसून चार गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान या तोडफोड बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका रिकामटेकड्या गुंडांने दारु ढोसून या वाहनांची तोडफोड केली आहे.दरम्यान या तोडफोड नंतर आता वाहन चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या वाहनांची तोडफोड करण्या-यांचे नाव‌ अक्षय राजेश बाबर ( रा.कोंढवा पुणे) असे आहे. त्यांने दारुच्या नशेत वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान या प्रकरणी सहकार नगर पोलिसांनी 👮 रात्रीच तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान सदर घटनेप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Previous articleमराठा आरक्षणावर १० सप्टेंबरला म्हत्वाची सुनावणी, कुणबी प्रमाणपत्रावर होणार निर्णय?
Next articleपुण्यात गणेशोत्सवापूर्वीच ATS ची मोठी कारवाई एकच खळबळ, कोंढव्यातून एकाच्या आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here