पुणे दिनांक २९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आज संपूर्ण महाराष्ट्रात मूक आंदोलन करणार आहेत.दरम्यान आज गुरुवारी अजित पवार गटाचे कार्यकर्ते हे प्रत्येक शहरात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्या समोर सकाळी ११ वाजता मूक आंदोलन सुरू करणार आहे.तसेच तालुक्यातील तहसीलदार यांना एक निवेदन दिले जाणार आहे.दरम्यान आता सत्ताधारी पक्षच आज रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच मोठे विधान केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वा-याने पडला आहे. मात्र यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तमाम १३ कोटी लोकांची जाहीर माफी मागतो.तसेच यातील दोषींवर कडक कारवाई करुन त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग करायला पाठवण्यात येणार आहे.