Home Breaking News काॅग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

काॅग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

50
0

पुणे दिनांक ३० ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौ-यावर आले आहेत.असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.दरम्यान आज सकाळी सहा वाजल्यापासून पोलिसांनी त्यांना त्यांच्या मुंबईतील घरात स्थानबद्ध केले होते.त्यांचे कार्यकर्ते यांना देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन देत नव्हते अखेर खासदार वर्षा गायकवाड यांनी सोसायटी समोर आंदोलन सुरू केले होते.आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान यापूर्वीच काॅग्रेस पक्षाचे आमदार अस्लम शेख व काॅग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांना देखील पोलिसांनी या पूर्वीच ताब्यात घेतले आहे.दरम्यान या बाबत बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले की मालवण येथे खासदार नारायण राणे व त्यांची मुले पोलिसांच्या अंगावर धावून जातात त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणतात ते आक्रमक नेते आहेत.असं म्हणून त्यांची हे सरकार पाठराखण करतात असं त्यांनी म्हटलं आहे.

Previous articleखासदार वर्षा गायकवाडांना पोलिसांनी घरातच केले स्थानबद्ध
Next articleशिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here