Home Breaking News शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी

62
0

पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.दरम्यान आज पालघर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणीचा शुभारंभ केला जात आहे.यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग येथील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना वेदनादायी असल्याचे म्हटले आहे.तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे.

दरम्यान यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्ग वरील घटनेवरून भाष्य केले.सिंधुदुर्गमध्ये जे झालं ते वेदनादायी आहे.आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे.महाराज नाहीत . आमच्या साठी . आमच्या सहका-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत.मी आज नतमस्तक होऊन माझ्या आराध्यदैवताच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आमचे संस्कार वेगळे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा काहीही मोठे नाही.काहीजण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देतात.अपमानित करतात.जनतेच्या भावना दुखवतात.मात्र माफी मागत नाही.हे आमचे संस्कार नाहीत.असे म्हणत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.

Previous articleकाॅग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Next article‘ हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही ‘ विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here