पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसाळल्या प्ररकणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.पुताळ्या च्या चबुत-याचं स्ट्रक्चरल ऑडिट डिझाईन करणा-या चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे.आता चेतन पाटील याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणी चौकशीत आणखी काय गोष्टी समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना चेतन पाटील यांने चबुत-याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं होतं.पुतळा कोसाळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एफआरआर दाखल करण्यात आला होता.तसेच पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान चेतन पाटील यांने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.मी फक्त चबुत-याचे काम केले आहे.मला हे स्ट्रक्चरल डिझाईन डिझाईन करून दिलं होतं.तसेच संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं.ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं असं चेतन पाटील यांने स्पष्ट केले आहे. दरम्यान शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा जयदीप आपटे अजून फरार आहे.त्याच्या शोधा करीता पोलिसांनी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत.पोलिस त्याच्या कल्याण येथील घरी जाऊन आले आहेत.पण तो घरी सापडला नाही पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा जबाब घेतला आहे.त्याच्या घराजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहे.पोलिसांच्या तीन टीम त्यांच्या शोधार्थ आहेत. पुणे मुंबई या ठिकाणी आपटे यांचा शोध घेत आहेत.