पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताचे ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मागितलेली माफी हा काॅग्रेस आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सततच्या निषेधाचा अन् आक्रमक भूमिकेचा परिणाम आहे.दरम्यान दिल्लीच्या पुढे महाराष्ट्र झुकत नाही.हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची थोडीही जाणीव होत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.अशी मागणी काॅग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.