पुणे दिनांक ३१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी काल अटक केली होती.त्याला मालवण येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.
दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी 👮 दिनांक ३० ऑगस्ट रोजी चेतन पाटील याला अटक करून मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले होते.त्याला आज मालवण येथील न्यायालयात हजर केले असता पोलिसांच्या वतीने पाटील यांची दहा दिवसांची पोलिस कस्टडी मागण्यात आली होती.यावेळी पोलिसांच्या वतीने सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की.पाटील याला पोलिसांनी कोणतीही प्रकारची मारहाण केली नाही.पण त्यांने जे काम केलं आहे.याचे पुरावे गोळा करायचे आहेत.यात अन्य कोण व्यक्ती सहभागी होत्या का.? याची तपासणी करावयाची आहे.त्यामुळे त्याला १० दिवसांची पोलिस कस्टडी द्यावी .अशी मागणी न्यायालयात केली.हा पुतळा पडला तिथे पर्यटकांचा जीव गेला असता.त्यामुळे बांधकाम कशा पद्धतीने करण्यात आले.त्यापूर्वी पर्यावरणाचा अभ्यास केला होता का ? याची माहिती घ्यायची आहे.त्याच्यासोबत आर्थिक देवाणघेवाण झाली का.? तसेच त्यांचा लॅपटॉप जप्त करायचा आहे.असा युक्तिवाद करण्यात आला.यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान आरोपी पाटील यांच्या वतीने देखील तब्बल कोल्हापूर येथील चार वकिल तर सिंधुदुर्ग कुडाळ येथील एक वकिल अशा पाच वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली आहे.