Home Breaking News महाराष्ट्रात येणाऱ्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याच्या इशारा

महाराष्ट्रात येणाऱ्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याच्या इशारा

64
0

पुणे दिनांक ३१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला आहे.त्या मुळे आज शनिवारपासून पुन्हा पाऊस कोसळणार आहे.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.मुंब‌ई.तसेच उपनगरात मुसाळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.या शिवाय मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.़दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या इशा-या नुसार येत्या ७२ तासात महाराष्ट्रातातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होईल.

दरम्यान साधारण दिनांक ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या दरम्यान पावसाचा चांगलाच जोर वाढलेला असेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर तयार झाली आहे.त्याची आता वाटचाल मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे.सद्य स्थितीत गुजरात किनारपट्टी पासून केरळ किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर मुंबई तसेच उपनगर विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक.नंदूरबार.धुळे. जळगाव.जिल्ह्यात पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच कोकणात देखील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.तसेच ठाणे व पालघर व आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

Previous article‘ मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार तसेच फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ‘ – सचिन सावंत
Next articleमराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज मालवण दौ-यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here