पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे वतीने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गेट – वे ऑफ इंडिया समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर जोडेमारो आंदोलन करणार आहे.दरम्यान या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी 👮 परवानगी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली नाही.तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीने हे जोडेमारो आंदोलन करण्यावर ठाम आहे .तर दुसरीकडे महायुती घ्या वतीने देखील महाविकास आघाडीला प्रतिउत्तर देण्यासाठी आंदोलन करणार आहे.याच पार्श्वभूमीवर या परिसरात मुंबई पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच गेट – ऑफ इंडिया आज सकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यत प्रत्येकांसाठी बंद राहणार आहे.