पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज रविवारी मुंबईत गेट- ऑफ इंडियाच्या चौकात महाविकास आघाडीच्या वतीने जोडेमारो आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे.दरम्यान आज रविवार असून मुंबईमधील ट्रॅफिक कमी असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईकरांना वेठीस न धरता आंदोलन ठेवले आहे.तरी या आंदोलनाला पोलिस हे महायुती सरकारच्या दबावाखाली आंदोलन कर्ते यांना परवानगी न देता वेठीस धरत आहे.दरम्यान आजच्या आंदोलनावर महाविकास आघाडीचे नेते मंडळी ठाम असून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे खास करुन ‘ कोल्हापूरी ‘ जोडे घेऊन या आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले आहे.उध्दव ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवार तसेच काॅग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आता थोड्याच वेळात त्यांचा ताफा हा हुतात्मा चौकात पोहोचतील तर पोलिसांनी 👮 गेट -ऑफ इंडिया मधील पर्यटकांना बाहेर काढले आहे.व त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट असा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सर्वत्र याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी बॅटरीचा केले आहे. यात महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.तसेच पुरुष कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर आजच्या जोडेमारो आंदोलनात सहभागी झाले आहेत.दरम्यान शिवसेना . काॅग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस.सहभागी झाले आहेत. मुंबईतील कंदील हाॅटेलच्या बाजुला देखील मोठ्या प्रमाणावर बॅरीकेंटीग केले आहे.तर या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी महायुतीकडून देखील आंदोलन सुरू करण्यात आले आहे.एकंदरीत महाविकास आघाडी बरोबर महायुती देखील आता आंदोलन करुन आज आमनेसामने आले आहेत . शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आंदोलनस्थळी हुतात्मा चौकात पोहोचल्या आहेत.नागपूर येथे देखील आंदोलन सुरू झाले आहे. दरम्यान पोलिसांची परवानगी नाकारली असताना देखील महाविकास आघाडीचे नेते मंडळी आज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिस दलातील हजारो पोलिस कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.