Home Breaking News नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या ‘ रामगिरी ‘ वर रात्री उशिरापर्यंत महायुतीची खलबतं, विदर्भातील जागेवर...

नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या ‘ रामगिरी ‘ वर रात्री उशिरापर्यंत महायुतीची खलबतं, विदर्भातील जागेवर काथ्याकूट

53
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रामगिरीवर तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील जागेवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यात‌ रात्री उशिरापर्यंत काथ्याकूट सुरू होते.यात तिन्ही नेत्यांचे या बैठकीत एकमत झाले आहे.अशी माहिती विश्र्वासनीय सूत्रांन कडून मिळत आहे.

दरम्यान काल लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम हा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे होता तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  संकल्प यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून ती काल नागपूरात धडकली होती . दरम्यान काल नागपूर येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमला सर्व नेते उपस्थित होते.त्यानंतर नागपूरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान रामगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये येऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणुकीत विदर्भातील जागेवर काथ्याकूट झाले.यात रात्रभर खलबतं झाली.यात तिघेजणांचे एकमत बैठकीत जागा वाटप बदल झाले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleआज सुपरसंडे महाविकास आघाडी व महायुती आज आमनेसामने,सकाळी दहा वाजल्यापासून गेट-ऑफ इंडिया पोलिसांकडून बंद
Next articleमराठा योध्दा मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्यावर दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here