पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरवर गोळीबार करून त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान आंदेकर यांच्यावर कोणत्या कारणाने गोळीबार व कोयत्याने वार करण्यात आले .हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान पोलिस आता घटनेनंतर पंचनामा करत असून ते पुढील तपास करीत आहेत.