Home Breaking News बीड . हिंगोलीत व यवतमाळ मध्ये मुसाळधार पाऊस

बीड . हिंगोलीत व यवतमाळ मध्ये मुसाळधार पाऊस

74
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यात मागील आठ तासांपासून मुसाळधार पाऊस कोसळत आहे.या मुसळधार पावसामुळे बीड मधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत आहे माजलगाव.वडवणी‌.परळी.केज.गेवराई.आष्टी यासह इतर तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच बाजारपेठा देखील ठप्प झाल्या आहेत.त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्ग यांना आजच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे.तसा फटका त्यांना बसला आहे.नदी .नाले.व  ओढे ओसंडून वाहत आहेत.त्यांना आजच्या मुसळधार पावसाने पूर आला आहे.तसेच बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प १०० टक्के भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

दरम्यान हिंगोलीत देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी .नाले व ओढ्यांना पूर आला आहे. सर्वत्र रस्त्यावर देखील पाणीच पाणी झाले आहे.तसेच शहरातील लोटस सुपर मार्केट.अंबिका ट्रेडर्स एजन्सी यासह एकूण १० ते १२ दुकानांमध्ये पाणी घुसल्याने  व्यापा-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तसेच पावसात दुचाकी वाहून गेल्या आहेत.तसेच नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.त्यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.दरम्यान‌ आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे वडसद या नाल्यांला पूर आला आहे.आलेल्या पूरामुळे या नात्याने रौद्र रूप धारण केले आहे.यामुळे याभागातील शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नाल्यालगत असलेल्या घरात पूराचे पाणी घुसले आहे. या ठिकाणी घरामध्ये तीनजण अडकले होते.त्यांना रेस्क्यू करून  बाहेर काढण्यात आले आहे.

Previous articleखास ‘ कोल्हापूरी ‘ जोडे घेऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने हुतात्मा चौकात दाखल
Next articleहिंगोलीत ढगफुटी सदृश्य मुसाळधार पाऊस पुरात ९ जण अडकले,बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाणारण.उपजिल्हाधिकारीचे मंत्रालयाला साकडं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here