Home Breaking News महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन

55
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवार १ सप्टेंबर असून आज  महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहे.दरम्यान महाविकास आघाडी च्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आज महायुती देखील राज्यभर आंदोलन करणार आहे.दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या नंतर माफी मागितली आहे.तरी महाविकास आघाडी च्या वतीने राजकारण सुरू आहे.असा आरोप महायुती च्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.दरम्यान आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे. तर ठाण्यात निरंजन डावखरे.तर रत्नागिरीत रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते ठिक ठिकाणी आज आंदोलन करणार आहेत.अशी माहिती विश्र्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Previous articleआज सुपरसंडे महाविकास आघाडीचे जोडेमारो आंदोलन.पोलिसांकडून परवानगी नाही
Next articleसमृद्धी महामार्गावर आयशर टेम्पो व ट्रॅव्हल्स बसची टक्कर १५ प्रवासी जखमी २ जण गंभीर रित्या जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here