Home Breaking News समृद्धी महामार्गावर आयशर टेम्पो व ट्रॅव्हल्स बसची टक्कर १५ प्रवासी जखमी २...

समृद्धी महामार्गावर आयशर टेम्पो व ट्रॅव्हल्स बसची टक्कर १५ प्रवासी जखमी २ जण गंभीर रित्या जखमी

58
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार  समृद्धी महामार्गावर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.समृध्दी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील १५ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.यात दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो हा संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर उभा असताना भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील एकूण १५ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान ही टक्कर एवढी भिषण होती की यात दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.यात ट्रॅव्हल्सच्या बसची काॅबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यात चालक व त्याचा सहाय्यक चालक यांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान हा समृद्धी महामार्गावर नेहमीच मोठ मोठे अपघात होतात. हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा महामार्ग झाला आहे.

Previous articleमहाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन
Next articleआज सुपरसंडे महाविकास आघाडी व महायुती आज आमनेसामने,सकाळी दहा वाजल्यापासून गेट-ऑफ इंडिया पोलिसांकडून बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here