पुणे दिनांक २ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा गुन्हा हा अहमदनगर येथील तोफखाना पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले.यावेळी आमदार नितेश राणे यांनी म्हटले की.रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून मारु.अशी धमकी दिली होती. दरम्यान यावरून आमदार नितेश राणे व मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.