पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आपटे हा पळून गेला आहे.त्याच्या शोधा करीता एकूण ७ पथके त्याचा शोध घेत आहेत.पण तो अद्याप पोलिसा च्या हाती लागलेला नाही.त्याच्या कल्याण येथील निवासस्थानी पोलिसांनी 👮 त्याच्या कुटुंबाला नजर कैदेत ठेवले आहे.व कडक पहारा पोलिसांनी ठेवला आहे.मात्र आपटे यांचा शोध न लागल्याने आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी अखेर त्यांच्या विरोधात आज लुकआऊट नोटीस जारी केली आहे.दरम्यान बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी अटक करून त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.तो आता पोलिस कस्टडीत आहे.