पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज एसटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान यावेळी एसटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदेनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वर सडकून टीका केली आहे.ते यावेळी म्हणाले की सदावर्ते एसटी कर्मचारी आंदोलनाला लागलेला काळा डाग आहे.ज्या एसटी कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत.त्या सदावर्ते यांच्या मुळेच झाल्या आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या सोन्यासारख्या एसटी बॅकेचे सदावर्ते यांने वाटोळे केले आहे.केवळ भुंकत राहायचे. तसेच मोठ्याने ओरडायचे.असे संदीप शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.