पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव आता ‘अहिल्यानगर ‘ करण्यास रेल्वेकडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत आता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान याबाबत तसे पत्रच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हरकत नसल्याचे पत्रच जारी करण्यात आलं आहे.यामुळे आता अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नामांतराचा मार्ग सुकर झाल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान यापूर्वी अहमदनगर महानगरपालिकाने तशी परवानगी दिली आहे.दरम्यान मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांच्या वतीने होत होती.त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नामांतराची घोषणा करत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता.