Home Breaking News पारंड्यात भाडे थकल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले टाळे

पारंड्यात भाडे थकल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले टाळे

186
0

पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार धाराशिव येथील पारंडा शहरातील भूमी अभिलेख कार्यालयालाच मुळ मालकानेंच टाळे ठोकले आहे. दरम्यान आता टाळे कार्यालयाच असल्याने अधिकारी कर्मचारी व शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर आता गैरसोय झाली आहे.दरम्यान भूमिलेख कार्यलयाने मागील अनेक दिवसांपासून मुळ मालकाला भाडे दिलेच नाही.एकूण १० लाख रुपयांचे भाडे थकले आहे. दरम्यान मालकाने वारंवार भाडे मागून देखील  मालकाला भाडे दिले नाही.त्यामुळे अखेर मालकाने कार्यलयाच टाळे ठोकले आहे.यावर आधी भूमिलेख कार्यालयाला कर्मचारी यांनी कुलूप लावले होते पण मालकाने देखील टाळ्यावर‌ टाळे ठोकलेले दिसत आहे. आता मालक देखील चांगलाच जिद्दीला पेटला आहे.मी आता भाडे मिळेपर्यंत टाळे काढणार नाही अशी भूमिकाच या इमारतीच्या मालकाने घेतली आहे.

Previous article‘ सदावर्ते म्हणजे एसटीला लागलेला डाग ‘ संदीप शिंदेची टीका
Next articleभारतीय जनता पार्टीतील अजून ४ ते ५ जण पक्ष सोडणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here