पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पक्षात आता अनेक नेते मंडळी नाराज असल्याची माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील हसन मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ महायुतीत आल्यानंतर आता कोल्हापूर कागल मधील भारतीय जनता पार्टीचे नेते समरजितसिंह घाडगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे कार्यकर्ते होते.मात्र कागल मतदारसंघ हा आता अजित पवार यांच्याकडे गेल्याने घाडगे यांनी आज जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. दरम्यान आता अजून भारतीय जनता पक्षात दोन डझन नेते मंडळी नाराज आहेत.त्यातील ४ ते ५ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.अशी माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे आता एक काळ असा होता की भारतीय जनता पक्षात अनेकजण येत होते तेच भारतीय जनता पक्षातून माघारी फिरत आहेत.ते म्हणतात ना ‘ जशी करणी ती भरणी ‘ ते आता भारतीय जनता पक्षाला रिटर्न गिफ्ट मिळत आहे.दरम्यान यातील ४ ते ५ नेते मंडळी हे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात जातील असं सांगण्यात येत आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.