पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सिंहगड रोडवर भरदिवसा एका युवकावर कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या युवका चे नाव सागर चव्हाण असं आहे.दरम्यान या हल्ल्या नंतर पोलिसांनी तातडीने दोन जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली की.यापूर्वी यातील जखमी सागर चव्हाण यांने इतर मित्रांसमवेत एका युवकावर कोयत्याच्या साहाय्याने हल्ला केला होता.दरम्यान मागे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज सागर याच्यावर हल्ला करण्यात आला आहे.अशी माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे.दरम्यान या प्रकरणी आता पुणे पोलिस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम आहे.असेच आजच्या हल्ल्या नंतर म्हणले तर वावगे ठरणार नाही.