पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद मध्ये म्हणाले की.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतच्या स्वारी बाबत नुकत्याच केलेल्या विधानावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.दरम्यान वस्तू सिथ्ती वेगळी असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केलेल्या स्वारी बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी वेगळे विधान केले आहे.पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा नव्हे तर सुरतेवर दोन वेळा स्वारी केली होती.दरम्यान याबाबत प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी देखील हेच सांगितले आहे.पण भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवीन पिढीला खोटा इतिहास सांगितला जातोय.असे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.