पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या राजकीय अपडेट नुसार राज्यातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीची लवकरच घोषणा आता होण्याची शक्यता आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून व वर्षांपासून हे घोंगडं भिजत पडलं होतं.तसेच महायुती सरकारला विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा तिढा सोडवून मिळणाऱ्या जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत.दरम्यान आता राज्यपाल नियुक्त एकूण १२ जागा आहेत.यात आता भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ विधानसभेत जास्त असल्या मुळे त्यांचा वाटा ‘ देवा भाऊचा ‘ जास्त आहे.त्यामुळे त्यांना ५० टक्के म्हणजे एकूण ६ जागा मिळणार आहे.यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ३ जागा तर अजितदादा पवार यांच्या गटाला ३ जागा मिळणार आहेत.यात आता भारतीय जनता पक्षाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील विधान परिषदेची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे.पण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाची तीन नावे ही अधिकृत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घोषित झाले आहे.यात प्रामुख्याने पुण्यातून न-हे येथील सामाजिक महिला कार्यकर्त्या रुपाली चाकणकर यांच्या सहित सिध्दार्थ कांबळे व ठाण्यातून आनंद परांजपे यांच्या नावाची शिफारस करण्यात येण्याची शक्यता आहे.