पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचारी यांचा संप मिटला आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांन प्रमाणे वेतनवाढ मिळावी म्हणून संप पुकारण्यात आला होता.दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगार प्रतिनिधी बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली यात एसटी कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपये वेतनवाढ द्यावी अशी मागणी केली होती.तर राज्य सरकारच्या वतीने मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ केली आहे.दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने एसटी बंद आंदोलन पुकारण्यात आल्याने प्रवाशांची दोन दिवस चांगलीच गैरसोय झाली होती.तर खासगी वाहन चालकांनी दोन दिवस जादा दराने पैसे घेतले जात होते त्यामुळे प्रवाशांची चांगलीच लुटमार करण्यात आली आहे.दरम्यान आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने उद्या लाल परी रस्त्यावर धावणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.