पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात काल सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्याची महायुती सरकारने पुरतर्ता न केल्याने काल लालपरीचे चाकं ठप्प झाली आहेत.त्यामुळे अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी यांचा काल चांगलाच खोळंबा झाला आहे.आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे.त्यामुळे आज बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समिती बरोबर बैठक होणार आहे.त्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची प्रमुख मागणी आहे.