Home Breaking News काॅग्रेस पक्षाचे केंद्रातील विरोधीपक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

काॅग्रेस पक्षाचे केंद्रातील विरोधीपक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

46
0

पुणे दिनांक ५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे नेते व केंद्रातील सरकार मधील विरोधी पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.दरम्यान महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण करण्यासाठी आज राहुल गांधी सांगली दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान सांगलीला जाण्यापूर्वी ते प्रथम नांदेड येथे जाऊन काॅग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.व त्या नंतर राहुल गांधी हे नांदेड वरुन विमानाने थेट कोल्हापूरला जाणार आहेत.व तेथून हेलिकॉप्टरने सांगलीला जाणार आहेत.त्यांच्या समावेत काॅग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे तसेच महाराष्ट्र काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.तसेच काॅग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असे नेते मंडळी असणार आहेत.

Previous articleआज ५ सप्टेंबर शिक्षक दिन
Next article‘ लाडकी बहीण योजनेवरुन ‘ मंत्री कॅबिनेटमध्ये एकमेकांना भिडले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here