Home Breaking News आज सकाळी साडेसहा वाजता कमला मिल परिसरातील टाइम्स टाॅवरला भीषण आग 🔥...

आज सकाळी साडेसहा वाजता कमला मिल परिसरातील टाइम्स टाॅवरला भीषण आग 🔥 धुराचे लोटने परिसर व्यापला

226
0

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील कमला मिल परिसरात असणाऱ्या टाइम्स टाॅवरला भीषण आग लागली आहे. दरम्यान ही आग लागताच बघता बघता आगीचा मोठा भडका उडाला आहे.संपूर्ण टाॅवरला आगीने मोठ्या प्रमाणावर वेढा मारला आहे.तसेच आगीमुळे या भागात धुराचे मोठे काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहे.त्यामुळे या भागात आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या आगीची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.पण आग मोठ्या प्रमाणावर पसरल्या मुळे पून्हा घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहेत.आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.या इमारती मोठ मोठ्या कंपनीचे कार्यालय आहेत.दरम्यान ही आग सकाळी लागल्यामुळे कंपन्या चे कार्यलय हे बंद आहेत.आता आठ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल आहेत.व अग्निशमन दलाच्या जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.व सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous article‘ लाडकी बहीण योजनेवरुन ‘ मंत्री कॅबिनेटमध्ये एकमेकांना भिडले!
Next articleखडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला,बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here