Home Breaking News पुण्यात सेल्फीच्या नादात इंद्रायणी नदीत बुडून मित्र-मैत्रिणीचा मृत्यू

पुण्यात सेल्फीच्या नादात इंद्रायणी नदीत बुडून मित्र-मैत्रिणीचा मृत्यू

237
0

पिंपरी -चिंचवड ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार  पुण्यात सेल्फीच्या नादात मित्र-मैत्रिणीचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.दरम्यान हे दोघेजण मावळमधील इंद्रायणी नदीत किनारी फिरायला गेले होते.त्यावेळी सेल्फी काढताना अचानकपणे मैत्रिणीचा पाय घसरून ती नदीत पडली.यावेळी तिला वाचविण्यासाठी मित्राने ताबडतोब नदीत उडी घेतली.पण नदीला पावसामुळे पाणी भरपूर असल्याने यात दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला आहे.दरम्यान पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.यात मृत्यू झालेल्या दोघांची नावे १) श्रेया सुरेश गावडे (वय १७ ) तर २) रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे ( वय २२ ) असे आहेत.दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleलाडकी बहीण योजना नवीन फाॅर्म भरा, लगेच ४ हजार ५०० रुपये मिळवा!
Next articleमुंबई ते गोवा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन एसटी बसचा भीषण अपघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here