Home Breaking News ‘ लाडकी बहीण योजनेवरुन ‘ मंत्री कॅबिनेटमध्ये एकमेकांना भिडले!

‘ लाडकी बहीण योजनेवरुन ‘ मंत्री कॅबिनेटमध्ये एकमेकांना भिडले!

217
0

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.पण आता या योजनेच्या श्रेयवादावरुन ‘ दादाचा वादा ‘ या जाहिरातीवरुन कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलाच राडा झाला आहे.यात शिवसेना गटाचे मंत्री हे चांगलेच आक्रमक झाले.व लाडकी बहीण योजनेचे श्रेय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवाराच कसे घेऊ शकतात ? असे म्हणून त्यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीतच राडा केला आहे.त्यानंतर बैठकीत शिवसेना गटाचे मंत्री यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत शांत केले.व ते म्हणाले महायुतीचे सरकार तीन पक्षाचे आहे.यापुढे कोणीही एकजण लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेणार नाही.अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री हे बैठकीत शांत झाले अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleकाॅग्रेस पक्षाचे केंद्रातील विरोधीपक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
Next articleआज सकाळी साडेसहा वाजता कमला मिल परिसरातील टाइम्स टाॅवरला भीषण आग 🔥 धुराचे लोटने परिसर व्यापला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here