पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर बनला आहे.तसेच कायदा सुव्यवस्था ही दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालली आहे. यात स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत.तसेच शिक्षणांचे माहेरघर पुण्यात कोयता गॅंगची दहशत व वाढणां-या घटना असोत.पुण्यात हत्याचे सत्र सुरूच आहे.तसेच गोळीबार महाराष्ट्रातील शहरे व गावं ह्या गुन्हेगारीने पूर्णपणे ग्रासून गेलेली आहेत.काल तर बदलापूर रेल्वे स्टेशन वर गोळीबार झाला आहे.असे उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले आहे.तसेच आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची पूर्ण पणे वाट लावली ह्या मिंधे-भाजपाने .असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.