Home Breaking News बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर फितुरीचे संस्कार – मनोज जरांगे पाटील

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर फितुरीचे संस्कार – मनोज जरांगे पाटील

127
0

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मी राजगादीला मानतो हे उद्यानराजे व संभाजीराजेंना माहित आहे.बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर फितुरीचे संस्कार आहेत.असा आज पलटवार मराठा समाजांचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.ते पुढे असं देखील म्हणाले की.आमदार राजेंद्र राऊत यांच्यापेक्षा माजी आमदार दिलीप सोपल हे बरे ते मराठा समाजाच्या विचारांचे व ओबीसी आहेत.हा आमदार राऊत कशाची पण शपथ घेतो.माझ्याजवळ त्यांने आता प्रर्यत पाच ते पन्नास वेळा शपथा घेतल्या आहेत.असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान ‘ मी फुकलो तरी असतो तरी उद्यानराजे महाराज पडले असते ‘ असं जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो त्यावेळी ते असं म्हटले होते असा आरोप बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दावा मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.तर राऊत यांना बोलायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.राऊत यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत.त्यांना आता विधानसभा निवडणुकीत सुट्टी नाही.मराठा समाजाच्या विरोधात जाणा-यांचा मराठा समाज बरोबर निवडणूकीत त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देईल असे देखील यावेळी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.दरम्यान आता मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील व बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात वाद आता चांगलाच चिघळला आहे.याचा फटका आमदार राऊत यांना येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बसेल असं मराठा समाजाच्या लोकांचं एकंदरीत म्हणनं आहे.

Previous articleहाॅटेलमध्ये जेवण न दिल्याने कंटेनर चालकाने हाॅटेलवरच घातला कंटेनर
Next article३१ हजार महिलांचं दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्वशीर्ष पठण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here