पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर आज गणपती बाप्पांचं विराजमान झाले आहे.दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बळीराजावरील विघ्न दूर व्हावं असं साकडं त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातलं आहे.तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान समृद्धी व्हावे.चालू वर्षी पाऊस चांगला झाला आहे. तसेच महायुती सरकारने चांगल्या योजना आणल्या आहेत.असं ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान तसेच ठाकरे गटाचे शिवसेनाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब आज पहिल्याच वर्षी लालबाग राजाच्या दर्शनासाठी दाखल होऊन दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्या समवेत आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासह सर्वांनी दर्शन घेतले.दरसाल प्रमाणे यावर्षी देखील उध्दव ठाकरे कुटुंबीय लालबागचा राजाच्या चरणी व दर्शनासाठी आले होते.लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून राजाची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे.तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान सागर या बंगल्यावर गणपती बाप्पा विराजमान झाले आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकुटुंब गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले होते.दरम्यान आज बाॅलीवूड कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.दरम्यान मुंबईतील मायानगरीत देखील कलाकारांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन वाजत गाजत झाले आहे.तसेच असंख्य गणपती बाप्पाचे भक्तांनी देखील आपआपल्या घरी गणपती बाप्पाला वाजत गाजत आणून प्राणप्रतिष्ठा केली आहे.आज गणेश चतुर्थी पहिला दिवस अनेक मंडळांच्या पंडाल मध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले.
र