पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट एका अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील पुणे ते सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील हाॅटेल गोकुळ मध्ये रात्रीच्या वेळी कंटेनर चालकाला हाॅटेल मालकाने जेवण न दिल्याने त्यांने रागाच्या भरात चक्क हाॅटेलवरच कंटेनर घालून या हाॅटेलची तोडफोड केली आहे.तसेच हाॅटेलवर उभ्या असलेल्या एका कारवर देखील कंटेनर घालून कारचे नुकसान केले आहे.दरम्यान सुदैवाने यात कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.संबधित कंटेनर चालक याने मद्यपान केले होते.दरम्यान आता या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.