पुणे दिनांक ८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून चक्क महायुती सरकारमधील भोसरी विधानसभाचे आमदार महेश लांडगे यांना आज रविवारी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या घटनेची पोलिस सूत्रांकडून मिळाले ल्या माहिती नुसार आज पिंपरी -चिंचवड पोलिस कंट्रोल रुमला एकाने फोन करून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे ठार मारण्याची मला सुपारी मिळाली आहे.असा फोन केला होता.दरम्यान या धमकी प्रकरणी आता पोलिसांनी तातडीने भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच मोशी येथून एकाला ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव उदय कुमार राय असे आहे.दरम्यान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर महायुतीच्या सरकार मध्ये आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.तसेच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे एकंदरीत धिंडवडे निघाले आहेत का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांन मध्ये आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे.