पुणे दिनांक ८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणा वर तुफान गर्दी होते.दरम्यान दरसाल प्रमाणे यंदाही शिवाजी रोडवरील श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर ३१ हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण आज रविवारी सकाळी पहाटेच झाले आहे.दरम्यान या अथर्वशीर्ष पठनाची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे.दरम्यान आता यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महिलांचं सहभाग वाढत आहे.
दरम्यान आज पहाटे पहाटेच्या सुमारास टाळाच्या गजरात यात सहभागी झालेल्या महिलांनी मोरया मोरयाचा गजर केलाय . दरम्यान दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर ऋषीपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पा समोर हजारो महिला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सामूहिक अथर्वशीर्ष पठण करत असतात ती परंपरा यंदाही कायम राहिली आहे. मोठ्या जवळपास ३१ हजार महिला या अथर्वशीर्ष पठण मध्ये भाग घेण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.