पुणे दिनांक ९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणा वर दिवसां दिवस वाढत आहे.तसेच कायदा सुव्यवस्थे च्या तीन तेरा नऊ बारा वाजल्या आहेत पुण्यातील कोयता गॅंगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान पुण्यातील उत्तमनगर येथे मित्रानेच मित्रावर भर रस्त्यावर किरकोळ कारणावरून वार करून त्याचा निर्घृण असा खून केला आहे.या कोयत्याच्या हल्ल्यात जयदीप भोडेकर (वय २२ रा.पुणे ) असे आहे.तर त्याच्या खूनाच्या आरोपा वरून त्याचा मित्र अमित गुजरला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान या खूनप्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार किरकोळ कारणावरून झाला आहे.जयदीप व अमित हे दोघेजण एकमेकांचे मित्र होते.तसेच यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून अमित यांने जयदीप याच्यावर भररस्त्यात कोयत्याच्या साहाय्याने वार करुन त्याचा खून केला आहे.या खूना नंतर पोलिसांनी अमित याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.दरम्यान पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम आहे.तर रोज पुण्यात एक ते दोन हत्या होत आहेत.आता पुणे हे शिक्षणाचे माहेरघर न राहता पुणे क्राइम सिटीचे घर झाले आहे. आता पुणेकर नागरिकांचा पुणे पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही.अशा संतप्त प्रतिक्रिया पुणेकर व्यक्त करत आहेत.