पुणे दिनांक ९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील न-हे परीसरात चक्क पत्नीनेच पतीची हत्या केली आहे.त्यामुळे न-हे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीचे नाव किरप्पा बिश्त असे पतीचे नाव आहे.तर त्याचा खून त्यांची पत्नी हिरा बिश्त असे आहे.हे दोघेजण नेपाळचे असून ते पुण्यातील न-हे भागात राहत होते.किरप्पा याला दारु पिण्याचे व्यसन होते.व तो दारु पिऊन पत्नी हिरा हिला त्रास देत असत काल रविवारी देखील पती दारु पिऊन आला व पत्नीला त्रास देत होता.यावेळी त्याच्या पत्नीने रागाच्या भरात चाकू 🗡️ त्याच्या छातीत मारला यावेळी तो गंभीर रित्या जखमी होऊन त्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.सदर खूनप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पत्नी हिरा बिश्त हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.