पुणे दिनांक ९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हिंदी दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे आज सोमवारी सायंकाळी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले आहे.ते ६० वर्षीय होते.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हिंदी पत्रकारितेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.दरम्यान अशोक अग्रवाल हे नि:पक्षपाती आणि निर्भय तसेच सचोटीवर आधारित पत्रकारिता करीता साठी प्रसिद्ध असं व्यक्तीमत्व होते.त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान अशोक अग्रवाल यांच्या दोन दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज सायंकाळी अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला.व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.अग्रवाल यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबासह त्यांच्या समाजातील आप्तेष्ट नातेवाईक समाज व पत्रकार तसेच संपादक राजकीय नेते व हितचिंतक व हिंदी दैनिक भारत डायरीचे वाचकवर्ग यांना मोठा धक्का बसला आहे.आता हिंदी दैनिकाची जबाबदारी त्यांच्या मुलांच्या खांद्यावर आहे.दरम्यान मराठी डिजिटल ई- पेपर पोलखोलनामाच्या वतीने अशोक अग्रवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.