पुणे दिनांक १० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गणेशोत्सवात नेरुळ रेल्वे स्थानकांवर आज पहाटे पासूनच तांत्रिक बिघाड झाला आहे.त्यामुळे हार्बर लाइनवरील अप-डाऊन सेवा मागील एक तासा पेक्षा खोळंबली आहे.त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रपंच हाल होत आहेत. दरम्यान या तांत्रिक बिघाडाबाबत रेल्वेच्या प्रशासकीय सूत्रांकडून कोणत्याही सुचना रेल्वे प्रवाशांना दिल्या नाहीत.त्यामुळे रेल्वे प्रवासी हे रेल्वे प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत.
दरम्यान या नेरुळ हार्बर रेल्वे स्थानकावर पहाटे पासून रेल्वे लोकल ट्रेन आप-डाऊन मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाडामुळे उभ्या आहेत.तसेच प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.दरम्यान यामुळे हार्बर लाईनवरुन पनवेल व ठाण्याच्या दिशेने धावणाऱ्या लोकल सेवा यामुळे विस्कळीत झाल्या आहेत.दरम्यान ही सेवा सुरू होण्यासाठी आणखी दोन तासांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.अशी माहिती आता रेल्वे प्रशासनाच्या वतीने मिळत आहे.