पुणे दिनांक १० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सध्या एक सोशल मीडियावर वंदे भारत एक्स्प्रेसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओ मध्ये चक्क काॅग्रेसच्या काळातील मालगाडीचे इंजिन हे वंदे भारत ट्रेनला खेचून आणत असल्याचा हा व्हिडिओ आहे.दरम्यान या बाबत काॅग्रेसने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.दरम्यान हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच काॅमेट करत आहेत.
दरम्यान हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान नवी दिल्ली येथून वाराणसीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस उत्तर प्रदेश येथील इटावा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तिच्या इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडली.त्यामुळे ब-याच वेळ ही ट्रेन एकाच जागी थांबून होती . दरम्यान बिघाड झाल्या नंतर टेकक्नीकल टीम ही घटनास्थळी पोहोचली व शर्थीचे प्रयत्न केले पण वंदे भारत ट्रेन सुरु झाली नाही. तेव्हा या ट्रेनला खेचण्यासाठी चक्क मालगाडीचे इंजिन मागविण्यात आले.या ट्रेन मध्ये एकूण ७३० प्रवासी होते.त्यांना या वंदे भारत एक्स्प्रेसचा मनस्ताप सहन करावा लागला.दरम्यान अखेर मालगाडीच्या इंजिनने चक्क वंदे भारत ट्रेन खेचून नेली व प्रवाशांनी अखेर निःश्वास सोडला.